मलकापूर येथे सेवा भारतीच्या फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन

मलकापूर येथे सेवा भारतीच्या फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन

समाजाच्या गरजा ओळखून त्यांची आवश्यकता पाहून समाजाची सेवा करण्याचे महान कार्य आंतरिक भाव जागृत ठेवूनच करत रहावे,त्यासाठी सदैव तत्पर रहा असे आवाहन रा. स्व. संघाचे प. महाराष्ट्र प्रांत संपर्क मंडळाचे सदस्य मदनगोपाल वार्ष्णेय यानी मलकापूर येथे फिरत्या रूग्णालय शुभारंभ प्रसंगी केले.

इचलकरंजी येथील सेवाभारती संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालया मार्फत शाहूवाडी तालुक्यातील विविध वाड्यावस्त्यावर सुरु होणाऱ्या फिरत्या रुग्णालयाच्या सेवेस प्रारंभ करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष अमोल केसरकर ,सेवा भारतीचे अध्यक्ष भगतराम छाबडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते फिरत्या वैद्यकिय रूग्णवाहिकेच उदघाटन करण्यात आले. तालुका कार्यवाहक महेश विभूते यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाहुवाडी तालुक्यातील वाडीवस्तीवर ही रूग्णसेवा सुरू करण्या पाठीमागची भूमिका आणि त्यासाठी केलेले नियोजन याची माहिती दिली. पुढे बोलताना मदनलाल वार्ष्णेय म्हणाले की समाजाच्या वेदना काय आहेत? समाजाच्या अडचणी काय आहेत? त्याची गरज काय? व या सर्वावर मी काही मदत करू शकतो काय? अशा विविध अंगानी समाजाविषयी विचार करणे अभिप्रेत आहे.

ज्या समाजात मी राहतो त्या समाजाचे दायीत्व माझे आहे व त्या
करिता मी सदैव सामाजिक भान ठेवण्याचा प्रयत्न करेन असा दृढनिश्चय समाजातील प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.त्यासाठी संघकामाचे आचरण आत्मसात करणे व त्याद्वारे मनुष्य निर्मितीचे काम अखंडपणे चालू ठेवण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. संघ कार्यकर्ते गट तट, भेदभाव पाळत नाहीत तर ते सेवाकार्यासारखे निर्मळ काम करतात. कशाचीही तमा न बाळगता काम करणे हा संघाचा स्थायि स्वभाव आहे. या कामाच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यानी केले.

नगराध्यक्ष अमोल केसरकर यानी संघाच्या कामाचे कौतुक करून या भागातील उपेक्षित ठिकाणी हवी ती मदत सेवाभारती ला देण्याचे वचन दिले. सेवाभारतीचे अध्यक्ष व जिल्हा संघचालक श्री भगतराम छाबडा यानी प्रास्ताविक पर मनोगतात सेवाभारतीची झालेली उभारणी आणि त्याचा आज झालेला विस्तार याची माहिती दिली.

दरम्यानयावेळी स्थापन केलेल्या प्रकल्प समिती सदस्यांचा अध्यक्ष श्री. भगतराम छाबडा यांच्या हस्ते प्रेरणा म्हणून पुष्पगुच्छ देवून सन्मान करणेत आला. त्यामध्ये श्री. महेश विभुते, डॉ. प्रशांत खुटाळे, श्री. विट्ठल येडगे, डॉ. ऱमेश पचकर, श्री. अनिलराव कुलकर्णी, श्री. अमर चौगुले, डॉ. ओंकार अंबिके, डॉ. सौ. मोहिनी अंबिके, डॉ.अमिता गांधी व डॉ. गजानन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.